जळगाव, प्रतिनिधी स्व. बबलू (हर्षित) महेंद्रकुमार पिपरिया यांच्या स्मृतीपित्यार्थ ज्ञान योग वर्ग, समस्त मित्रपरिवार व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
स्व. बबलू हर्षित महेंद्रकुमार पिपरिया यांच्या स्मृतीपित्यार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन विसनजी नगरातील पप्पू पेपर किंग जवळील हर्षित अँड कंपनी
योगा हॉल येथे करण्यात आले. बबलू पिपरिया हे एक समाजसुधारक होते, ते नेहमी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची भावना स्व. बबलू पिपरिया यांची बहिण श्वेतल महेंद्रकुमार पिपरिया यांनी व्यक्त केली. या शिबिरात ७१ दात्यांनी रक्तदान केले. शिबीर याश्वितेसाठी महेंद्रकुमार पिपरिया, भूमी हर्शित पिपरिया, ज्ञान हर्शित पिपरिया, राज पटेल, दीपक कुमार गुप्ता, ज्योती व्यास, धरित व्यास, प्रगटेश व्यास, महेश गायकवाड, शिरीष लोहार, गौरव प्रजापती, राजेंद्र पिपरिया, नवीन पटेल, डॉ. विशाल पिपरिया, अमित पिपरिया, हार्दिक पिपरिया, विकी पिपरिया, ग्रंथ पटेल आदींनी कामकाज पहिले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/190176316093959