मंगलकार्यालयातून दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

 

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हिरापूर रोडवरील एका लग्नाच्या गर्दीतू अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागीन्यासह अडीच लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे.

राजु निंबा कुमावत (वय-५८ , रा. शशीकला नगर, हिरापूर रोड) हे शिक्षक आहेत. त्यांच्या मुलीचे ८ डिसेंबर रोजी लग्न होते. करगांव शिवारातील विराम लॉन्स येथे लग्न ठेवण्यात आले होते. राजू कुमावत यांच्याकडे लग्न असल्यामुळे लग्नात मुलीसाठी सोन्या चांदीचे दागीने यांच्यासह २ लाख १६ हजार रूपयांची रोकड मंगलकार्यालयात आणली होती. सकाळी लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करायला बसली होती. दुपारी नवरदेव आणि नवरी यांचा सप्तफेऱ्याचा कार्यक्रम सुरू असतांना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एका पर्समध्ये ठेवलेले दागीने व २ लाख ३५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली.

दरम्यान, मंगलकार्यालयात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात एक अल्पवयीन मुलगा आणि दोन जणांनी ही पर्स चोरून नेल्याचे समोर आले आहे. राजु निंबा कुमावत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content