Home क्राईम पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकू हल्ला

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकू हल्ला


पाचोरा (प्रतिनिधी) संपत्तीच्या वादातून पती-पत्नीत सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणास चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील माहेजी येथे घडलीय. दरम्यान, जखमी तरुण हा विवाहितेचा मावस भाऊ असल्याचे कळते.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यात माहेजी येथे एका दाम्पत्यात काही दिवसापासून संपत्तीवरून वाद सुरु होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पत्नीच्या नावाची मालमत्ता आपल्याला मिळावी यासाठी हनिफ शेख अब्दुल हा त्याच्या पत्नीला मारहाण करत सतत त्रास देत होता. आज सकाळी देखील सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हनिफ शेख हा आपल्याला पत्नीला गल्लीत मारहाण करीत होता. यावेळी विवाहितेचा मावस सलमान शेख हा तिला वाचवण्यासाठी आला मध्यस्थी करायला आला असता हनिफने त्याला चाकू मारून गंभीर जखमी केले. जखमी सलमानला तात्काळ पाचोरा ग्रामिण रूग्णालय दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पिडीत विवाहिता गर्भवती असल्याचे देखील कळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound