भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा निवडणूकीसाठी आज माघारीच्या दिवशी सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूकीसाठी ९ उमेदवार यांच्या लढत होणार आहे. यात भाजपचे आमदार संजय सावकारे, काँग्रेसचे डॉ.राजेश मानवतकर आणि वंचितचे जगन सोनवणे यांच्या खरी तिरंगी लढत होणार आहे.
निवडणूकीतून ७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उर्वरित ९ जणांना निवडणूकीचे चिन्ह वाटप करण्यात आले. माघारीमध्ये निलेश प्रभाकर बोदडे, पुष्पा जगन्नाथ सोनवणे, प्रशांत मनोहर तायडे, भुपेश विश्राम बाविस्कर, अॅड.प्रविण नाना सुरवाडे, शेख रहिम शेख अहमद व रविंद्र बळीराम सपकाळे यांचा समावेश आहे. तर निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ.राजेश तुकाराम मानवतकर, भाजपाचे उमेदवार आ. संजय वामन सावकारे , बहुजन समाज पार्टीचे राहुल नारायण बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जगन्नाथ देवराम सोनवणे तर अपक्ष म्हणून अजय जीवराम इंगळे, गौरव धनराज बाविस्कर, जगदाळे प्रतिभा सुजित, सुशिल ज्ञानेश्वर मोरे, स्वाती कुणाल जंगले असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.