जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ९ अर्ज दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.

आज झालेल्या लोकशाही दिनी  एकूण 9 तक्रारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था- 3,  अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, जळगाव -1,

टंचाई शाखा, जि.का. जळगाव -2, कुळकायदा शाखा, जि.का. जळगाव -2 तहसिलदार जामनेर,-1 यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आदि विभागांचे  अधिकारी,  प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर  गावाहून नागरीक येत असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण/निराकरण  होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांनी आजच्या बैठकीत सर्व संबंधितांना दिला.

Protected Content