राज्यसभेत गोंधळ घालणारे ८ खासदार निलंबीत

 

नवी दिल्ली । राज्यसभेत कृषी विधेयक संमत करतांना गोंधळ घालणार्‍या विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना आज सभापती वैकय्या नायडू यांनी आठवडाभरासाठी निलंबीत केले आहे.

नवी दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून रविवारी राज्यसभेत गोंधळ करणार्‍या विरोधी पक्षातील ८ सदस्यांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी एका आठवड्यासाठी निलंबित केले आहेत. या सदस्यांमध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजीव सातव, के.के. रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सय्यद नजीर हुसेन आणि इलामराम करीम यांचा समावेश आहे. तसेच सभापतींनी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव देखील फेटाळला. नायडू आज म्हणाले की काल राज्यसभेसाठी सर्वात वाईट दिवस होता. काही सदस्यांच्या आचरणाने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, ज्यामुळे राज्यसभेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहचली आहे.

नायडू यांनी राज्यसभेच्या सदस्यांनी चांगले आचरण अंमलात आणणे गरजेचे असून प्रत्येकाने आत्मचिंतन करावे असे सूचित केले. दरम्यान, त्यांनी राज्यसभेच्या उपसभातींवर आणलेल्या अविश्‍वास प्रस्तावाला देखील फेटाळून लावले आहे. यावर विरोधी पक्षातील खासदारांनी केलेल्या गदारोळानंतर हे सभा सकाळी १०.३६ पर्यंत तहकूब करण्यात आले.

Protected Content