जिल्ह्यात आज 7 हजार 759 जणांनी घेतली कोवीशिल्डची पहिली लस

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 38 लसीकरण केंद्रावर आज दिवसभरात 7 हजार 759 जणांना कोवीशील्डची पहिली लस तर 594 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 1 लाख 23 हजार 87 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात आज मंगळवारी 30 मार्च रोजी तब्बल 1 हजार 191 बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आले आहे.  कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 38 ठिकाणी लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. 

जिल्हा शासकीय रूग्णालय-258, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल-108, जामनेर-66, चोपडा-23, मुक्ताईनगर-50, चाळीसगाव-79,   पारोळा- 167, अमळनेर-51, पाचोरा-98, रावेर-26, यावल-50, भडगाव-56,  एरंडोल-49, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-266, एमडी भुसावळ-62, खडका रोड-81,  जळगाव जैन हॉस्पिटल-49, धरणगाव-38, यावल यार्ड-145, बाद्री प्लॉट भुसावळ-150, पाल-12, पिंपळगाव-16, पहूर-16, नाव्ही-35, सावदा-51, वरणगाव- 113 आणि रोटरी क्लब जळगाव – 256, नानीबाई हेल्त पोस्ट- 70, पीएचसी सेंटर-2 हजार 363, सबसेन्टर-102, खासगी हॉस्पीटल-2 हजार 589 असे एकुण 7 हजार 759 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 594जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content