मार्च एंडिंगला कामांच्या निपटाऱ्यासाठी अधिकारी, ठेकेदारांची लगबग

 

 जळगाव,  प्रतिनिधी । मार्च एंडच्या कामांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग उडाली आहे. आज मार्च एंडच्या कामांसाठी लोकप्रतिनिधींसह ठेकेदारांची जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली  होती.

मार्च एंडमुळे शासनाच्या विविध  योजनांचा निधी मार्गी लावण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढलाआहे. अहोरात्र जिल्हा परिषदेमध्ये कामकाज सुरू होते. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभाग वगळता इतर विकासाच्या योजनांना ब्रेक लागला होता . डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पादुर्भाव असल्याने २७ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात कामांची वर्दळ वाढली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजना पटलावर घेऊन नवीन कामांना सुरुवात झाली होती .  मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढल्याने शाळा, महाविद्यालय बंद करण्यात येऊन पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. सन २०२१-२२  या वर्षासाठी जिल्हा परिषदेचा १६  कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे.  आता मार्च एंडिंग च्या कामांची सर्वच विभागात वर्दळ वाढली आहे . त्यात शनिवार , रविवार आणि होळी धुलिवंदनच्या सुट्टी सुट्ट्यांमुळे जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. मात्र मार्च एंडिंग या कामांसाठी अधिकारी आणि  कर्मचारी कामाला लागले असून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, सिंचन, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग,पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग,आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांच्या नवीन बांधकाम योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी एकच धावपळ उडाली. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मार्च एंडिंगचे कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.सामान्य प्रशासन विभाग वगळता बांधकाम विभागाने ३० ५४, ५० ५४,  जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास योजना, रस्ते दुरुस्ती आदी योजनांचा समावेश आहे. सिंचन विभागात जिल्ह्यातील छोटे लघुपाटबंधारे दुरुस्ती व बांधकाम करणे,शिक्षण विभागात नवीन शाळा खोल्या बांधकाम,शाळा दुरुस्त्या कामांना सुरुवात करण्यात आली होती . महिला व बालकल्याण विभाग विभागात अंगणवाडी दुरुस्ती,नवीन अंगणवाडी बांधकाम तर कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची कामे पूर्ण करणे,ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना,प्रधानमंत्री पेजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना आदी कामे करण्यावर भर दिला जात आहे.तसेच पशुसंवर्धन विभागात जनावरांसाठी औषध खरेदी करणे, जिल्हा परिषद आरोग्य विभागात उपकेंद्र बांधकाम,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम दुरूस्तीची कामे करणे,औषधी साठा खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.            

दरम्यान वित्त व लेखा अधिकारी विनोद गायकवाड  यांनी सांगितले की,  यंदा जिल्हा जिल्हा परिषदेच्या १६  कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून आता मार्च एंडिंग च्या कामाची धावपळ सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या विविध योजनांची कामे मार्गी लावण्यात येत आहे.शासनाच्या विविध योजना वरील निधीला प्रशासकीय मान्यता देऊन खर्चाचा लेखाजोखा सादर करण्यात येत आहे. –

 

Protected Content