जिल्ह्यात आज ६१६ कोरोना बाधीत; ४०२ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढल्याने रूग्ण देखील वाढत असून आज जिल्ह्यात ६१६ बाधीत आढळून आले आहेत. याच्या जोडीला ४०२ रूग्णांनी आज कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६१६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १०१ रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अनेक तालुक्यांमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१०१; जळगाव ग्रामीण-३४; भुसावळ-३०; अमळनेर-४२; चोपडा-८६; पाचोरा-३६; भडगाव-३९; धरणगाव-२८; यावल-१४; एरंडोल-९; जामनेर-३६; रावेर-३०; पारोळा-५२; चाळीसगाव-६५; मुक्ताईनगर-१; बोदवड-११ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २ असे एकुण ६१६ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २१७१३ इतकी झालेली आहे. यातील १४९४५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४०२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ५ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७१८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६०५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content