Home Cities अमळनेर श्री मंगळ ग्रह मंदिरात ५१ फुटी महामंगल गुढी

श्री मंगळ ग्रह मंदिरात ५१ फुटी महामंगल गुढी

0
98

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात मंगळवारी जर गुढीपाडवा असेल तर ५१ फुटाची महामंगल गुढी उभारण्यात येते.यावर्षी शहरातील सचिन ड्रेसेसचे संचालक प्रवीण मोरे यांनी सपत्नीक विधिवत गुढीचे पूजन केले. याप्रसंगी मंगल वाद्यासह शंखनाद व श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरात दत्त भगवान व अनघा माता यांच्या मंदिराजवळ चौथर्‍याचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाचे जळगावातील भाविक किशोर बोंडे सपत्नीक मानकरी होते. तसेच स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले.

शेगाव येथील भाविक विद्याधर महादेव बारद्धे, सदाशिव शामराव बारद्धे, छत्रपती संभाजी नगरातील भाविक सत्यजित वसंतराव देशमुख, शिरपूर येथील भाविक हिरालाल गोविंद चौधरी यांनी हे भूमिपूजन केले.मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी.ए. सोनवणे, सेवेकरी पुशंद ढाके तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound