वृध्द महिलेचे बंद घर फोडून ५० हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवरील प्रताप नगरात राहणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे बंद घर फोडून ५० हजारांची रोकड आणि घरातील काही साहित्य चोरून नेल्याची घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मी अविनाश माथुरवैश्य (वय ६४, रा. प्रताप नगर, रिंगरोड, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. २४ ते २७ जानेवारी या कालावधीत त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातून ५० हजारांची रोकड व इतर साहित्य चोरून नेले.

ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Protected Content