आव्हाणे शिवारातून एकाची दुचाकी लांबविली

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील माळी नगर येथील हातमजूराची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार २१ सप्टेंबर रेाजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय अंबादास लोखंडे (वय-५२) रा. सावता माळी नगर, आव्हाणे शिवार, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीटी २४६६) घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल अनिल तायडे करीत आहे.

Protected Content