आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

 

 

जळगाव-संदीप होले । आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणारे कोरोना महामार्गाच्या संकटात ज्यांनी आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविका यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मोबदला वाढीव मोबदला तसेच प्रोत्साहन भत्ता आणि सर्व देयके बाकी ठेवलेले आहे. महानगरपालिकेच्या या कारभारामुळे आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविका यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी थकित मानधन, मोबदला व प्रोत्साहन भत्ता अशी देयके अदा करण्याचे आदेश असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने थकीत मानधन मोबदला प्रोत्साहन भत्ता व सहा महिन्यांपासून थकीत असलेले देयके त्वरित बँक खात्यात वर्ग करावी, या मागणीसाठी बुधवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले आहे. जोपर्यंत थकीत मोबदला व मानधन मिळत नाही, तोपर्यंत दैनंदिन कामबंद राहण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Protected Content