जळगावात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

crime 1

जळगाव प्रतिनिधी । साईटपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून महार्गावर पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बांभोरी महाविद्यालयाजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मेंद्र मिथलेश बरहार (वय 16 मूळ रा. उथरगाव, उत्तरप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. धर्मेंद हा आज सकाळी त्याची दुचाकीत (एम.एच.19.बी.वाय.8521) पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. बांभोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. यानंतर पुन्हा बांभोरीकडे निघाला. यावेळी खोल साईडपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जावून महामार्गावर पडला आणि पाळधीकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने ( डब्लू.बी. 17, 4335) त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बांभोरी येथील ग्रामस्थांनी त्याला ओळखले. त्याची ओळख पटविल्यावर त्याचे मेव्हण्यांना माहिती देण्यात आली. जैन इरिगेशनच्या रुगणवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी ट्रकसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Protected Content