धुळे, प्रतिनिधी | धुळे- शिरपूर वाघाडी येथे झालेल्या केमिकल फॅक्टरीच्या स्फोटातील मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाने प्रत्येकी ५ लाखांची मदत तसेच जखमींचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या मदतीची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी दिली आहे. सकाळी घटनेची वृत्त कळताच ना.रावल हे मुंबईहुन शिरपूरकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. लवकरच ते घटनास्थळी पोहचणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.