आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने होणार भरती-अब्दुल सत्तार

धुळे प्रतिनिधी | जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला आरोग्य विभागातील पद भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार आरोग्य विभागातील पाच संवर्गातील १० हजार १२७ पदे तातडीने भरण्याची मागणी आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने १० हजार १२७ पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंर्त्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्री मंर्त्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल.

राज्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे १० हजार १२७ पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास लवकरच आरोग्य विभागातील पाच संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची १० हजार १२७ पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची भरती होणार आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.