अबब : जिल्ह्यात ४८७ नवीन पॉझिटीव्ह; जळगाव, एरंडोलमध्ये कोरोनाचा स्फोट !

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४८७ नवीन रूग्ण आढळून आले असून यात जळगावसह एरंडोल तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ४८७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ९९ रूग्ण हे जळगावात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल एरंडोल तालुक्यात ७९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-२९; भुसावळ-२३; अमळनेर-३२; चोपडा-४५;पाचोरा-८; भडगाव-४३; धरणगाव-१७; यावल-९; जामनेर-२८; रावेर-६; पारोळा-३४; चाळीसगाव-२६; बोदवड-४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १३५७४ इतकी झालेली आहे. यातील ९३४४ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच १९९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ५९२ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ३६३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकुण रूग्ण

जळगाव शहर- ३३९८, जळगाव ग्रामीण- ६८०, भुसावळ- १००३, अमळनेर- ९०६, चोपडा- ९८५, पाचोरा- ५५२, भडगाव-५८७, धरणगाव-६१९, यावल-५०९, एरंडोल-७३०, जामनेर-९५८, रावेर-३७९, पारोळा- ५५०, चाळीसगाव-६३७, मुक्ताईनगर- ४१३, बोदवड- २५६, अन्य जिल्हा ५२ एकुण १३ हजार ५७४ रूग्ण आढळले.

Protected Content