सावद्यातील श्री दत्त मंदिराची ४५० वर्षांपूर्वीची परंपरा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा श्री दत्त मंदिर संस्थानचा इतिहास सुमारे 400 ते 450 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झालेली आहे. महानुभाव संप्रदायाचे मंदिर असून श्री दत्तात्रय प्रभूंचे विशेष याची येथे स्थापना करण्यात आली. माहूर येथून एका सदभक्ताने ही मूर्त डोक्यावर आणलेली आहे. सावद्यापर्यंत आल्यावर मुक्काम केल्यावर या जागेवरून श्रीदत्तमूर्ती हललीच नाही अनेक प्रयत्न झाले. परंतु श्रीदत्तमूर्ती तेथून हलेना नामस्मरण तथा प्रार्थना सर्व काही झाले. त्या दिवशी मुक्काम केला. तेव्हा त्यांना स्वप्नात जाणवले की या जागी मला राहायचे आहे आणि त्याप्रमाणे त्या सर्व लोकांनी या जागेवर एक छोटेसे मंदिर बांधून स्थापना केली. काही कालांतराने भव्य असे मंदिर येथे बांधण्यात आले. परंतु त्यालाही साधारण दोनशे वर्षे झालेली असावीत मंदीराचे असे जुने मातीचे पेंड असलेले मंदिर येथे अस्तित्वात होते.

भालोद तथा सावदा येथील सद्भक्त मंडळी या मंदिराचे व्यवस्थापन अनेक वर्ष करीत होते. परंतु संत संचालक इथे कुणीच नव्हते. 1984 मध्ये महान तपस्वी महंत भालोदकर जनार्दन बाबा यांनी महानुभाव संप्रदायाचे ज्येष्ठ व महान अधिकरण गुरुवर्य पारीमांडल्य कुलभूषण आचार्य श्री मानेकर प्रभाकर बाबांना या मंदिराच्या संचालक पदी आदरणीय पू श्री गोविंदराज दादा यांचे सहयोगाने नियुक्त केले. त्यानंतर आदरणीय बाबजिनी 36 वर्ष या मंदिराचे संचालन केले. त्यांचे काळात या मंदिराचा 2011 मध्ये जीर्णोद्धार होऊन भव्य मंदिर उभारले गेले. आदरणीय बाबांनी 2011 मध्येच विद्यमान गादिपती आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांची गादिपती तथा संस्थानचे संचालक म्हणून नियुक्ती केली तेव्हापासून परिसरातील सर्व संत महंत तथा सद्भक्ताच्या सहयोगाने मंदिराचे संचालन आचार्य श्री मानेकर सुरेशराज शास्त्रीजी करीत आहेत त्याचा वार्षिक समारंभ संपन्न होत आहे

Protected Content