भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील 1X660 में.वॅ. प्रकल्पातील वारंवार घडत असलेल्या अपघातांची मालिका प्रसार माध्यमातून वेळोवेळी केलेली असून महाजेनको आणि भेल प्रशासनाकडून याबाबतीत सतत दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.भेल कंपनीचे प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांच्या मनमानी कारभाराला महाजेनको प्रशासनाकडून आज पावतो कुठलाही लगाम लावला गेला नाही. एकंदरीत एवढे अपघात आणि जीवितहानी होत असताना महाजेनको प्रशासनाकडून कुठली कार्यवाही होत नसल्याकारणाने असे स्पष्ट होते की भेल प्रशासनाच्या आणि महाजेनको प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या दरम्यान फार मोठी वैयक्तिक आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे नाकारता येत नाही.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
दिनांक 13/12/2024 रोजी बॉयलर डकचे काम करताना इंडवेल कंपनीचे दोन कर्मचाऱी भीषण अपघातामध्ये जबर जखमी झाले. हे दोन्ही कामगार 35 मीटर उंचीवरून 17 मीटर उंचीपर्यंत खाली कोसळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.अपघातग्रस्त कामगारांना अपघाताच्या ठिकाणी दवाखान्यात नेण्याकरिता कुठलेही वाहने वा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. सदर कामगारांना दवाखान्यात नेण्याकरिता 500 में.वॅ. प्रकल्पातून रुग्णवाहिका मागविण्यात आली आणि त्या कामगारांना खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी रवाना करण्यात आले. सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नव्हती. इंडवेल कंपनीमध्ये 400 कामगारांचे वर कामगार काम करत असून सदर कामगारांना कोणतेही प्रकारची वैयक्तिक सुरक्षा साधने पुरवली गेलेली नाही. औद्योगिक सुरक्षा नियमानुसार सदर कंपनीमध्ये सुरक्षा अधिकारी असणे अनिवार्य आहे.परंतु सदर कंपनीमध्ये बऱ्याच महिन्यांपासून कोणताही सुरक्षा अधिकारी काम करीत नसून कोणत्याही कामाचे परमिट न घेता बेधडक वेगाने कामे सुरू आहेत. ही सर्व कामे भेल प्रशासनाच्या अधिपत्याखाली सुरू असून यास भेल प्रशासन आणि महाजेनको प्रशासन दोन्ही जबाबदार आहेत.
लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून वारंवार महाजेनकोचे उपमुख्य अभियंता वकारे साहेब आणि औद्योगिक सुरक्षा अधिकारी महेश फेगडे यांना सूचित करून सुद्धा त्यांच्याकडून भेल प्रशासनाविरुद्ध कुठलीही कार्यवाही आज पावतो केली गेली नाही.
कामगारांच्या आरोग्याचा आणि जीविताचा विचार केला असता ओ.एच.सी. बाबत वेळोवेळी महाजेनको प्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आज पावतो कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही.सदर ओ.एस.सी बाबतचा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार लवकरच लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून उघड होणार आहे अणि त्यामधील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच इतक्या दिवसांपासून 660 में.वॅ. प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान कोणत्याही कंपनीच्या कामगारांना रिफ्लेक्टर जॅकेट कोणत्याही कंपनी मार्फत देण्यात आलेले नसून महाजेनकोच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यासमोर असुरक्षित नियमबाह्य कामे सुरू आहेत.सदर प्रकल्पातील घोटाळे लवकरच जनतेच्या समोर येणार आहे. सदर प्रकल्प उभारणी दरम्यान महाजेनको प्रशासनाचा कुठलाही दबाव भेल प्रशासनावर दिसून येत नाही. याउलट महाजेनको प्रशासनाचे मुख्य अभियंता आणि उपमुख्य अभियंता हे भेल प्रशासनाचे प्रकल्प संचालक जावदे यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे आढळून येत आहे.
सदर अपघातांबाबत महाजेनकोच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांकडून सुद्धा भेल प्रशासनाच्या विरोधात कुठलेही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याकारणाने सदर आर्थिक घोटाळ्यांमध्ये महाजेनकोच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांचा आणि प्रकल्प संचालकांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व दोषी अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) प्रशासनाकडे तक्रार करून त्यांची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.तसेच सर्व प्रकरणांची चौकशी होईपर्यंत भेल कंपनीला कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये याबाबत वरिष्ठांकडे मागणी करण्यात आलेली आहे.