जळगाव जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६ मतदार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदार संघ मिळून जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६ मतदार आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९ लक्ष ९४ हजार ४६ इतके मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
त्यात १ लक्ष ३७ हजार ३५० पुरुष मतदार तर ९ लक्ष ५६ हजार ६११ महिला मतदार व ८५ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात १८ लक्ष २१ हजार ७५० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ९ लक्ष ४१ हजार ७३२ पुरुष मतदार तर ८ लक्ष ७९ हजार ९६४ महिला मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर ५४ तृतीयपंथी मतदार नोंदविण्यात आले आहेत.

Protected Content