Home क्राईम मुंजलवाडीतून दोन लाखांच्या २५ मेंढ्या लंपास

मुंजलवाडीतून दोन लाखांच्या २५ मेंढ्या लंपास

0
45

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी मेंढपाळाच्या वाड्यातून तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या २५ मेंढ्या व एक मेंढा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंजलवाडी (ता. रावेर) येथील गट क्रमांक 83 मध्ये इकबाल झिप्रा तडवी यांच्या शेतातील मेंढ्यांच्या वाड्यात ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी संधी साधून वाड्यातील मेंढ्या पळवून नेल्या. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या चोरीमध्ये 1 लाख 54 हजार रुपये किमतीच्या २५ मेंढ्या, 38 हजार रुपये किमतीच्या बिजवाई जातीच्या मेंढ्या तसेच 8 हजार रुपये किमतीचा एक मेंढा असा एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पशुपालन हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय असलेल्या कुटुंबासाठी ही चोरी मोठा आर्थिक फटका मानली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. ग्रामीण भागात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच अशा चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound