महावितरण कंपनीतील मयत बाह्यस्त्रोत कामगाराच्या कुटुंबास ३० लाखाचा धनादेश सुपूर्द

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जयकिसनवाडी येथील निवासस्थानीआमदार लताताई सोनवणे यांच्याहस्ते कर्तव्यावर असतांना कोविडच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या महावितरण कंपनीच्या कामागाराच्या कुटुंबियांना ३० लाख रूपयांचा धनादेश आज सुपूर्त करण्यात आल.

महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नासिक यांच्या मार्फत महावितरण कंपनी मधील चोपडा-1 उपविभागातील विरवाडे उपकेंद्रात बाह्यास्त्रोत कामगार म्हणून कार्यरत असलेले मूळचे खंबाडे ता. शिरपूर जि. धुळे येथील रहिवाशी  कै.विशाल रतीलाल पारधी यांचे 6 जून रोजी कर्तव्यावर असताना कोविडच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या  पश्चात त्यांची पत्नी व सहा महिन्याचा मुलगा तसेच आई आणि वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

आमदार लताताई सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नासिक यांच्याकडून शासनाच्या परिपत्रक नुसार आर्थिक मदत म्हणून 30 लाख रुपये देण्यात आले. सदर आर्थिक मदत ही पत्नी प्रियांका विशाल पारधी यांना रुपये २० लाख तसेच आई संगीताबाई  रतिलाल पारधी यांना रुपये १० लाख मदत आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नासिक संस्थेच्या वतीने श्री.दिनेश पगार, अॅड. सत्यजित पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, दिनेश चौधरी, प्रशांत चौधरी ऋषिकेश कोळी इत्यादी उपस्थित होते.

Protected Content