
कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूलाजवळ काल झालेल्या स्फोटानंतर आता परिसरातल्या नाल्यात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहेत.
काल उजळाईवाडी उड्डाण पूलाखाली झालेल्या स्फोटात ट्रक चालक दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना उजळाईवाडी उड्डाण पूलाजवळ शोधमोहीम राबवत नाल्यात लपवलेली आणखी स्फोटकं हस्तगत केली. बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटकं हस्तगत करून चाचणीसाठी पाठवली आहेत.