निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिली अधिकृत मान्यता

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेले तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता तेच चिन्ह असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे.

निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

Protected Content