Home राजकीय देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल; गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल; गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

0
31


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एकीकडे राज्यात सत्तासंघर्षासाठी मोठी राजकीय भूकंप होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या भेटीची उत्सूकता सर्वांना लागून आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी २७ जून रोजी मुंबईल भाजपाची कोअर कमिटीची बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २८ जून रोजी फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे.  देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शाह यांच्या भेट घेणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदेदेखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. गुवाहाटीत बंडखोर आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे रवाना होण्याची शक्यता इंडीया टुडेच्या सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होऊन चर्चा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसचे खा. नासीर हुसेन यांनी भाजपाने महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांशीही संपर्क साधल्याचा दावा केला आहे. तसेच यावेळी त्यांनी बंडखोर आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत परत येतील आणि लवकरच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 


Protected Content

Play sound