चोपडा पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर : विविध गट-गणांमध्ये अनुसूचित व मागास प्रवर्गांना आरक्षण


चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत एकूण सहा गट आणि बारा गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण प्रक्रियेद्वारे विविध प्रवर्गांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सोडतीनुसार विरवाडे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरला आहे. त्याचप्रमाणे नागलवाडी गण अनुसूचित जमातीसाठी, तर विरवाडे गण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. धानोरा गट हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला असून, धानोरा प्र.अ. गण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाला आहे. मंगरूळ गण अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे.

अडावद गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला असून, अडावद गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तर वर्डी गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे. अकुलखेडा व लासूर गट हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले असून, अकुलखेडा गण सर्वसाधारण तर लासूर गण देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.

घोडगाव गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे. या गटातील गणपूर गण अनुसूचित जमाती तर घोडगाव गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाला आहे. चहार्डी गट अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असून, चहार्डी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तर गोरगावले बु. गण (महिला) प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात आला आहे.

संपूर्ण सोडतीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली गेली असून, स्थानिक जनतेमध्ये आता उमेदवारी निश्चितीबाबत चर्चांना सुरूवात झाली आहे. विविध राजकीय पक्ष या आरक्षण संरचनेनुसार आपली रणनीती ठरवतील अशी अपेक्षा आहे.