बाेलेरो वाहनांसह २५ नग सागवान लाकडे जप्त; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील सावदा-तांदळवाडी रस्त्यावर बुलेरो पिकअप (क्रमांक MH 04 GF-7263) वाहनातून विनापरवाना २५ नग सागवान लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर रावेर वन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली असून एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांदळवाडी गावाजवळ संशयास्पद वाहन आढळले. पाठलाग करून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १.२२१ घन मीटर सागवान लाकूड आढळले. वाहनचालक युवराज सिताराम तायडे (वय ३५, रा. मांगलवाडी) याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.

वाहन व लाकडांची एकूण किंमत ३ लाख ८८ हजार ११६ रुपये असून त्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम ४१(२)(ब), ४२ व ५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वाहन व लाकूड रावेर आगार डेपो येथे जमा करण्यात आले आहे. ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज मॅडम, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी आर.आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे व समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजय नारायण बावणे यांच्या टीमने केली.

Protected Content