मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा मोठ्या अपेक्षांनी तयार केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटतात. याचा ताजा उदाहरण म्हणजे अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर स्टारर “द लेडी किलर”. तब्बल ४५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या क्राइम-थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर केवळ 60,000 रुपये कमावले आणि हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा फ्लॉप म्हणून ओळखला जाऊ लागला.
“द लेडी किलर”चे निर्मितीप्रक्रियेत अनेक अडथळे आले. 2022 मध्ये सुरू झालेली चित्रपटाची शूटिंग 2023 मध्ये दुसऱ्यांदा करण्यात आली, ज्यामुळे बजेट वाढले. मात्र, अनेक कारणांनी चित्रपट अर्धवटच रिलीज करावा लागला. मीडियानुसार, चित्रपटाचा क्लायमॅक्सही पूर्ण करण्यात आलेला नव्हता, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला.
चित्रपट अर्धवट बनवलेला असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नव्हती. ट्रेलर रिलीज नंतर कोणत्याही प्रकारचे प्रमोशन झाले नाही, ज्यामुळे प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला नाही.
चित्रपटाला योग्य प्रकारे डिस्ट्रीब्यूशन मिळाले नाही. त्यामुळे फक्त 293 तिकीटे विकली गेली. नेटफ्लिक्ससोबतची डील टिकवण्यासाठी अपूर्ण फिल्म रिलीज करण्यात आली, पण नंतर नेटफ्लिक्सनेही पाऊल मागे घेतले. बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळल्यानंतर “द लेडी किलर”ला सप्टेंबर 2024 मध्ये टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर मोफत रिलीज करण्यात आले. तिथे मात्र चित्रपटाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला, आणि तो 3.5 मिलियन वेळा पाहिला गेला.