जिल्ह्यात आज २२६ नवीन रूग्ण; जळगाव तालुक्यात बाधितांची सर्वाधीक संख्या

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात नवीन २२६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह तालुक्यातील संसर्ग वाढ कायम असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २२६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण २८ रूग्ण आढळून आले आहेत. म्हणजे जळगाव तालुक्यात तब्बल १२२ रूग्ण आढळले आहेत. याच्या खालोखाल जामनेर-२५; चोपडा-२४; अमळनेर-२१ अशी कोरोना बाधीतांची संख्या आढळून आली आहे.

अन्य ठिकाणांचा विचार केला असता भुसावळ-१०; पाचोरा-२; भडगाव-६; धरणगाव-३; यावल-२; एरंडोल-५; पारोळा-३; चाळीसगाव व बोदवड-प्रत्येकी १ व अन्य जिल्ह्यातील १ अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६३९३ इतका झालेला आहे. यातील ३८८७ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५४९; कोविड हॉस्पीटलमध्ये-१२७ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये २६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३४३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content