शेंदूर्णीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ जणांकडून दंड वसूल !

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथे आज संध्याकाळी पहुर येथिल पोलिस दूरक्षेत्र कार्यालय परीसरात बॅरिकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी विनामास्क व विनाकारण भटकणाऱ्या २२ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे,अमोल देवडे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी, गजानन ढाकणे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवरे व होमगार्ड पथकाने  ही कारवाई केली. तसेच येथील बसस्थानक परिसरात बेकायदेशीर छंना मन्ना(मटका) घेत असलेल्या एका व खिंडी दर्जा भागात गावठी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा नोंदवून कारवाई केली अवैध धंद्यावर नियमितपणे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले आहे.

सकाळी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी व नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे, व पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी,गजानन ढाकणे,अमोल देवरे यांच्या पथकाने आज येथिल बसस्थानक परिसरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या १२ नागरिकांकडून प्रत्येकी १००/-रुपये प्रमाणे १२०० रुपये दंड वसूल केला.नगरपंचायत व पोलीस प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देऊनही काही नागरिक विनाकारण विनामास्क फिरत कोरोना १९ रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपायांना खो देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्याने नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली उद्यापासून कारवाई आणखी कडक करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले आहे.

 

Protected Content