पाळधी येथे अवैध कत्तलखान्यातून २२ गुरांची सुटका; संशयित फरार, रामानंद पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अवैध कत्तल खान्यात संबंधित चोरीच्या गुरांसह इतरही अशी 22 गुरे आढळून आली आहेत. सदरची सर्व गुरे पोलिसांनी ताब्यात घेवून पांझरापोळ येथील गोशाळेत रवाना केली आहेत. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह फौजफाट्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित फरार असून पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एमएच 19 कॅफे हॉटेजवळ असलेल्या साईप्लाझा याठिकाणी अपार्टमेंटच्या कम्पाऊंडमधून गुरे चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी गुरे मालकाने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती. चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. याचदरम्यानच्या काळात भुसावळ शहरातून गुरे चोरीची घटना समोर आली होती. एकाच संशयितांचा दोन्ही ठिकाणच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. रामानंदनगर पोलिसांसह , भुसावळ पोलिसांकडून संबधित गुन्ह्याचा तपास सुरु होता.

रामानंदनगर परिसरात घटनेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या वाहनातून चोरीची गुरे नेण्यात येत होती. त्या वाहनावरुन पोलिसांना संबंधित गुरे ही पाळधी येथे असल्याची धागेदोरे मिळाली. त्यानुसार पोलिसांकडून गोपनीय तपास सुरु होता. पाळधी येथे गुरे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक पाळधीत धडकले. याठिकाणी अवैध कत्तल खाना असल्याची माहिती मिळाल्यावर पथक त्याठिकाणी गेले असता, पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यातील गुरांसह इतर गुरे मिळून आली. याठिकाणी गुरांची चरबी तसेच शिंगेही पडली असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

कत्तलखान्यात मिळून आली 22 गुरे

कायदा व सुव्यव्यस्था लक्षात घेता, तसेच याठिकाणच्या काहींचा कारवाईला विरोध होत असल्याने कर्मचार्‍यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना संपर्क साधला. रोहन यांनी तत्काळ प्रकार वरिष्ठांना कळविला. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पाळधी, धरणगाव येथील फौजफाटा मागवून घेतला. 50 ते 100 कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात पोलिसांनी ही कारवाई केली. घटनास्थळाचा पंचनामा करुन याठिकाणची गाय, वासरु, गोर्‍हे, बैल याप्रकाराची एकूण 22 गुरे मिळून आली. पोलिसांनी ही गुरे दोन आयशर वाहनातून पांझरापोळ येथील गोशाळेत दाखल केली आहे. गुरे पळू नये म्हणून गुरांच्या पायाला लोखंडी पाईपने संंशयितांकडून मारहाण करण्यात आली. गुरांच्या खालावलेल्या प्रकृतीवरुन गुरांना गेल्या काही दिवसांपासून चारा व खायला काहीच दिले जात नसल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या गुरांमध्ये रामानंदनगर परिससरातील 6 गुरे तसेच भुसावळ चार गुरांसह इतर ठिकाणच्या गुरांचा समावेश आहेत.

संशयित फरार 

अनेक वर्षापासून पाळधीत अवैधपणे हा हा कत्तलखाना सुरु आहे. अनेक तक्रारी होत्या. मात्र स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. आज पुन्हा चोरीची गुरे याठिकाणी आढळून आल्याने येथील कत्तलखान्यासह संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून होत आहे. दरम्यान याठिकाणी संशयित फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलीस कामाला लागले आहेत.

 

Protected Content