जिओ ऑफिस फोडून कॉपर वायरची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नटवर मल्टिप्लेक्स येथील दुसऱ्या मजल्यावरील रिलायन्स जिओ इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे ऑफिस फोडून 3 हजार रुपये किमतीचे एसीचे कॉपर वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 जून रोजी सकाळी 7 वाजता समोर आले. याप्रकरणी सोमवारी 1 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता जळगाव शहर पोलिसात या चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धीरज कुमार मनी भूषण प्रसाद सिन्ना वय-43, रा. अहुजा नगर, जळगाव हा तर आपला कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांचे नटवर मल्टिप्लेक्स येतील दुसऱ्या मजल्यावर रिलायन्स जिओ इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे ऑफिस आहे. 26 जून रोजी सकाळी 7 वाजता सुमारास या ऑफिस फोडून 3 हजार रुपये किमतीचे कॉपर वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकारे चौकशी अंतिम अखेर सोमवारी 1 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे हे करीत आहे.

Protected Content