दुचाकीचा धक्का लागल्याने विटनेर येथील तरूणाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा धक्का खाटीला लागल्याच्या रागातून तालुक्यातील विटनेर येथील प्रकाश भानुदास सोनवणे (वय-२८) या तरूणाला जमावाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी उपचार घेवून ३ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील विटनेर येथील प्रकाश सोनवणे हा तरूण आपल्या दुचाकीने २ मार्च रोजी रात्री ९ वाजता कामावरून घरी जात होता. गावातील त्यांच्या गावातील रहिवाशी धनराज श्रीकिसन नरवाडे यांच्या अंगणातून जात असतांना प्रकाश सोनवणेच्या दुचाकीचा धक्का अंगणातील खाटीला लागला. या कारणावरून धनराज श्रीकिसन नरवाडे यांनी गाडीसमोर आडवा होवून प्रकाशला शिवीगाळ केली. खाटीला धक्का लागल्याचा राग आल्याने धनराज नरवाडे याने बेकायदेशीर मंडळी जमा करून प्रकाशला शिवीगाळ केली याला विरोध केल्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच गल्लीतील कैलास श्रीकिसन नरवाडे, संजय वामन भगत, गजानन वामन भगत, राजू सुपडू भगत, विशाल संजू भगत आणि गजानन शालीग्राम दवंगे सर्व रा. विटनेर यांनी सोडू नका असे बोलून दमदाटी केली. सर्वांनी मिळून कैलास सोनवणे याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रकाश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बळीराम सपकाळे करीत आहे.

Protected Content