फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपुर नगरपरिषदेत आज प्रभाग रचनेचे प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात शहरात १० प्रभाग असून एकुण २१ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती फैजपूर मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी दिली आहे.
फैजपूर नगरपरिषद सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यासंदर्भात फैजपुर नगरपरिषदेच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी माहिती देण्यासंदर्भात गुरूवार १० मार्च रोजी फैजपूर नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी १० मार्च ते १७ मार्च ३ तीन वाजेपर्यंत प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात जमा करण्यास करण्याचे आवाहन, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी दिले आहे
प्रभाग रचना या प्रमाणे राहील
प्रभाग क्रमांक १ – वार्डातीललोकसंख्या ४ हजार ३०७ लोकसंख्या असून अनुसूचित जाती १६४ आणि अनुसूचित जमाती ५७६ अशी आहे. या प्रभागाची व्याप्ती – त्रिवेणी मंदिर, खंडोबावाडी रोड, यावल रोड परिसर, लक्ष्मी नगर, आशिष सराफ नगर, नदीजवळील इस्लामपुरा झोपडपट्टी, भाग, तहा नगर, उर्वरित भाग, सानेगुरुजी नगर, राजबाग पिवळी कॉलनी असा राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक २ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ९९३ यात अनुसूचित जमाती ९९५ आहेत. प्रभागाची व्याप्ती ही – कळमोदा रोड, पूर्वीच्या हद्दीतील तहा नगर, न्हावी दरवाजा, तडवी वाडा, नारखेडे वाडा या प्रमाणे राहील.
प्रभाग क्रमांक ३ – वार्डातील लोकसंख्या ३ हजार ४९ आहे. यात अनुसूचित जाती ७८ तर अनुसूचित जमाती ४१० आहे. प्रभागाची व्याप्ती ही – होले वाडा, रथ गल्ली, इस्लामपुरा झोपडपट्टी, मित्तल नगर आणि वाघोदा रोडवरील काही भाग असा प्रभागाची व्यक्ती आहे.
प्रभाग क्रमांक ४ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ६५६ आहे. या प्रभागातील व्याप्ती – रथ गल्ली, होले वाडा, हाजिरा मोहल्ला, तूप गल्ली, काझी गल्ली, न्हावी दरवाजा परिसर, जुनी मुन्सिपल हायस्कूल समोरील भाग.
प्रभाग क्रमांक ५ – वार्डातील एकुण लोकसंख्या २ हजार ८६८ असून अनुसूचित जाती ७ आणि अनुसूचित जमाती १६ याप्रमाणे असून प्रभागाची व्याप्ती – विठ्ठल मंदिर, खंडोबा वाडी, पोलीस स्टेशन, न्हावी दरवाजा, नाथ वाडा, भारंबे वाडा, गांवहळा, देवी वाडा, पेहेड वाडा, रंगार घाटी, तूप गल्ली.
प्रभाग क्रमांक ६ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ९४१ आहे. यामध्ये अनुसूचित जाती १११ तर अनुसूचित जमाती ११ अशी आहे. या प्रभागाची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहे- खुशाल भाऊ रोड, देवी वाडा, त्रिवेणी वाडा, सुभाष चौक, अंबिका देवी मंदिर, पेहेड वाडा, सराफ गल्ली, किरंगे वाडा, कुरेशी मोहल्ला, सतपंथी मंदिर परिसर.
प्रभाग क्रमांक ७ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ५८४ असून अनुसूचित जाती ५७ तर अनुसूचित जमाती १५ याप्रमाणे असून प्रभागाची व्याप्ती ही होले वाडा, लक्कड पेठ, हाजिरा मोहल्ला, कासार गल्ली, मोठी पाण्याची टाकी परिसर, चावडी धोबी वाडा, कुरेशी मोहल्ला, मित्तल नगर, वाघोदा रोडचा खालील भाग, गणपती वाडी, पार्वती कॉलनी, उपासना कॉलनी, कॉलेज परिसर असा राहणार आहे.
प्रभाग क्रमांक ८ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ९७३ असून अनुसूचित जाती ७६८ तर अनुसूचित जमाती ६७ आहेत. या प्रभागाची व्याप्ती – डॉ.बाबासाहेब नगर, सुभाष चौक, अण्णाभाऊ साठे नगर, कुरेशी मोहल्ला, आठवडे बाजार, रामदेव बाबा नगर, दक्षिण बाहेर पेठ, श्रीराम पेठ, पोस्ट गल्ली, मुन्सिपल हायस्कूल, सुतार गल्ली ,ज्येष्ठ नागरिक हॉल, श्री स्वामी समर्थ केंद्र, गजानन वाडी, साईनगर असा राहणार आहे.
प्रभाग क्रमांक ९ – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ७१५ असून यात अनुसूचित जाती १०९ तर अनुसूचित जमाती ७६ याप्रमाणे आहे. या परिसराची व्याप्ती – फैजपूर बसस्थानक परिसर, शिवाजीनगर आसाराम नगर, दूध शीतकरण केंद्र, यावल रोड, नगरपरिषद कार्यालय इमारत, याप्रमाणे असेल आणि
प्रभाग क्रमांक १० – वार्डातील एकूण लोकसंख्या २ हजार ६४७ यात अनुसूचित जाती ५२१ तर अनुसूचित जमाती ४५१ आहेत. या प्रभागाची व्याप्ती – अण्णाभाऊ साठे नगर, फॉरेस्ट डेपो परिसर, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, विद्या नगर, श्रीकृष्ण नगर, आराधना कॉलनी, गुरुदत्त नगर कॉलनी, नम्रता नगर, जनशक्ती कॉलनी या प्रमाणे राहणार आहे.