मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रालयासमोरील गेटजवळ आमदार नरहरी झिरवाळ आदिवासी समाजातील काही आमदारांसह आंदोलन करत आहेत. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणझे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्याच सरकार विरोधात आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी आजपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. या आंदोलनात त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदार देखील सहभागी झाले आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
या आंदोलनादरम्यान नरहरी झिरवळ यांनी माधमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकार टीका केली. “पद आणि आमदारकी समाज ठरवतो. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. पेसा भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाही. आठ दिवसांपासून मुलं आंदोलन करत आहेत. यासंदर्भात आम्ही सरकारला बैठक घेण्याची विनंती केली होती. मात्र, सरकारने बैठक घेतली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली”, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.