विद्यापीठ कर्मचारी पतपेढीतर्फे २०० वृक्षांची लागवड

ca45c52b 5463 4387 a801 a4fdde987718

जळगाव, प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढी यंदा पतपेढी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने पतपेढीच्या संचालक मंडळाने विद्यापीठाच्या कर्मचारी भवन परिसरात आज (दि.७) २०० वृक्षांची लागवड केली आहे.

 

यात प्रामुख्याने, कडूलिंब, चिंच, पिंपळ, वड, जामून इ.जातीच्या वृक्षांची लागवड करून पतपेढीने त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही स्विकारली आहे. कुलगुरूंनी पतपेढीच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.आज वृक्ष लागवडीच्या पहिल्या टप्प्यात कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
पतपेढीच्यावतीने अध्यक्ष डॉ. महेंद्र महाजन यांच्या हस्ते त्यांना वृक्ष भेट देण्यात आला व त्यांच्याच हस्ते वृक्षाची लागवडही करण्यात आली. यावेळी पतपेढीचे उपाध्यक्ष मनोज वराडे, सचिव ईश्वर सामुद्रे, संचालक, श्रीमती वैशाली शर्मा, राजू सोनवणे, अरूण सपकाळे, अशोक पाटील, कल्याण ठाकरे मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे यांच्यासह राहूल नन्नवरे, पद्माकर कोठावदे, सुनील आढाव, चंदन मोरे, स्नेहल कुंवर, श्री. भामरे, शंकर गुरले, गोकुळ पाटील, अरविंद पाटील, जगन्नाथ पाटील, आनंदराव पाटील हे उपस्थित होते.

Protected Content