जागतिक अपंग दिन : आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते लाभार्थ्यांना लाभ

WhatsApp Image 2019 12 03 at 5.53.29 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी |  अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे, अपंगत्व हे शारीरिक कमतरता न ठरता ते बलस्थान व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग हा शब्द सरकार आणि समाजात प्रचलित केला. लवकरच खास दिव्यांग बंधू –भगिनींचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करून त्यांना आधार देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी या केले.

आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते  प्रेरणा अपंग विकास बहुउद्देशीय संस्था चाळीसगावच्या वतीने सिंधी समाज मंगल कार्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त बस पास वाटप व अपंग सर्टिफिकेट वाटप व दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार  करण्यात आला. याप्रसंगी वीरशैव कंकय्या समाजाचे अध्यक्ष शिवलाल साबणे, नगरसेवक अरुण मोतीलाल अहिरे, प्रियांका स्पोर्ट्स चे संचालक सचिन बोरसे, कवी गौतमकुमार निकम आदी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी भाजपा राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या. ऑनलाइन प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या नावाने बोगस योजना लाटणाऱ्यांवर आळा बसला. आमदार म्हणून शासनाचा एक घटक या नात्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी विविध ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी असणारा राखीव निधी हा कसा दिव्यांगांच्या कामांसाठी खर्च करता येईल यासाठी सर्वोतोपरी मदत व पाठपुरावा करेन असे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते दिव्यांग बंधू – भगिनींना साहित्य, बसेस पास वाटप, दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी संस्थेचे राहुल अहिरे, नीलकंठ साबणे, श्री पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content