नाशिक विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. या निवड चाचणीतून जळगाव जिल्हा खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे शरद पवार व पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य प्रो डॉ एल पी देशमुख, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे विनोद देशमुख व ‘डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे’च्या प्रो डॉ अनिता कोल्हे, इंजि विनोद काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या निवड चाचणीतून जळगाव जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ १६,१८ व २१ वयोगटातील प्रत्येकी १८ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून अंतिम संघ शिबिरातून निवडण्यात येईल. हे संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवड झालेल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव अर्बन सेल जिल्हाध्यक्षा डॉ.अश्विनी देशमुख, कार्याध्यक्ष मनोज वाणी, अर्बन सेल समन्वयक मुविकोराज कोल्हे, निरीक्षक मिलिंद सोनवणे, जुबेर खाटिक, प्रविण महाजन यासह राज्य गुप्त वार्ता विभागाचे माजी पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, विभागीय सचिव रवींद्र कंखरे, संचालक भाऊसाहेब पाटील व विनोद पाटील, इफतेखार शेख यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वितेसाठी पंच म्हणून इफतेखार शेख, अमजद पठाण, दर्शन आटोळे यांचे सहकार्य मिळाले.

Protected Content