धावत्या रेल्वे गाडी खाली एकाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या जवळच असलेल्या आसोदा रेल्वे गेटच्या जवळ धावत्या रेल्वे गाडी खाली स्वत:ला झोकून देत एका प्रौढ व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आसोदा रेल्वे गेटजवळ असलेल्या अप लाईनवर खंबा क्रमांक ४२१/२५-२८ दरम्यान यशवंत हेमराज चौधरी (वय ५५, रा. जुना खेडी रोड) यांनी धावत्या रेल्वे गाडी खाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मृतदेह रूळांवर आढळून आला. मयत व्यक्तीच्या खिशात असलेल्या डायरीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. या बाबत शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात पाठविले आहे. या संदर्भात शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content