इगतपुरीतील भावली धरणात २ तरूण आणि ३ तरूणींचा बुडून मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरीमध्ये भावली धरणावर फिरण्यासाठी आलेल्या ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये २ तरुण आणि ३ तरुणींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. अनस खान दिलदार खान, नाझिया इमरान खान, मिजबाह दिलदार खान, हनीफ अहमद शेख आणि ईकरा दिलदार खान अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली असून. या घटनेने खान आणि शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावली धरणाच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. आज भावली धरण परिसरात २ तरुण व ३ तरुणी असे पाच जण रिक्षा घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर यामधील काही जणांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. एकापाठोपाठ एक सर्वजण पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाचही जण बुडू लागले. परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळून शकली नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. यामध्ये काही जण अल्पवयीन आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी नागरिक मदतकार्यासाठी पुढे आहे. त्यांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Protected Content