जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील झुलेलाल वाटरपार्क येथे लॉकरमध्ये ठेवलेले २ मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकिला आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार २८ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेख परवेज शेख उस्मान (वय-२३) रा. खडकारोड ग्रीन पार्क, भुसावळ हा तरुण काही मित्रांसोबत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे असलेल्या झुलेलाल वाटर पार्क येथे आला होता. त्यावेळी त्यांनी एक लॉकर घेऊन त्या ठिकाणी दोन मोबाईल ठेवले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत लॉकरमध्ये ठेवलेले १६ हजार रुपये किमतीचे दोन्ही मोबाईल चोरून नेले. शेख परवेज याने सर्वत्र परिसरात दोन्ही मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईल कुठेही आढळून आलेले नाही. अखेर त्यांनी बुधवार २९ जून रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.