गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट समोरील पार्किंगमध्ये लावलेली सुतारकाम करणाऱ्या मजुराची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत बुधवार २९ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीरा शेख हुसेन (वय-५५) रा. तरसोद रोड, नशिराबाद हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान २७ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गोलाणी  मार्केट येथे कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ एन ६९६३) वरून आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. या संदर्भात त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बुधवार २९ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. गजानन बडगुजर करीत आहे.

Protected Content