“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अंतर्गत स्व.निखिल खडसे स्कूलला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन क्रीडा व शिक्षण विभागांतर्गत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या परिकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत” मुक्ताईनगर तालुक्यातील माध्यमिक विभागातून पंचायत समिती शिक्षण विभाग मुक्ताईनगरतर्फे आयोजित डॉ .बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पारितोषिक वितरण सोहळ्यात स्व.निखील खडसे इंग्लिश मिडीयम स्कूलला घेण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाचे रुपये ३ लाखाचे पारितोषिक तथा स्मृतिचिन्ह देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी आपल्यासह शिक्षकांसह आ. चंद्रकांत पाटील, गटशिक्षणाधिकारी मदन व्ही. मोरे, केंद्रप्रमुख धनलाल भोई, संजय ठोसर, योगेश भोसले, भूषण चौधरी, विजय चौधरी, गणेश कोळी आणि शेख भिकन, सुनील आर आढागळे ज्येष्ठ शिक्षक आणि तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मा. मुख्याध्यापक सर्व शाळांचे सहशिक्षक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक स्विकारले.

मुख्याध्यापक व्ही. के.वडस्कर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हा बहुमान आमच्या करिता फार मोठ्या अभिमानाची व स्वाभिमानाची बाब राहील. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय व ब्रीद राहिलेले आहे ते साकार करण्याकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि या संदर्भात वेळोवेळी शाळेचे अध्यक्ष तथा सचिव केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभात असते तसेच हा बहुमान कुण्या एकट्याचा नसून संपूर्ण एन. के. एस. परिवाराचा आहे. आणि मी मुख्याध्यापक म्हणून माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे तथा त्यांच्या पालकांचे या संदर्भात हार्दिक- हार्दिक अभिनंदन करतो आणि पुरस्कार वितरित करून आम्हाला गौरोन्वित केल्याबद्दल आणि असा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिक्षण विभाग पंचायत समिती मुक्ताईनगर तथा उपस्थित सर्व शाळां चे मुख्याध्यापक मा.पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे आभार मानतो तथा इतर पारितोषिक प्राप्त शाळांचे कौतुक व हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो.

Protected Content