दिव्या बारीने पटकविले जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुर्वण पदक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील दिव्या मुकेश बारी हिने  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेतर्फे महानगर जिल्हा पातळीवर आयोजित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन शालेय सिकई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत जिल्हा पातळीवर अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

दिव्या ही महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव विभाग माजी विभागीय सचिव, विभागीय संघटक कॉ.मुकेश बारी यांची कन्या आहे. ती शारदाश्रम विद्यालय कोल्हे नगर शाळेची विद्यार्थिनी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तर्फे महानगर जिल्हा पातळीवर आयोजित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन शालेय सिकई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत जिल्हा पातळीवर अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिची पुढील राज्य स्तरीय स्पर्धा मुंबई  येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.  त्या नंतर ती गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.  यापूर्वी संभाजी नगर येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिच्या यशाबद्दल दिव्या व तिचे पालक यांचे परिमंडळ, मंडळ विभागीय उपविभागीय शाखा पदाधिकारी, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content