कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात १३ बाधित रूग्ण आढळले !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २९ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर आज १० तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर -०, चोपडा -०, पाचोरा -०, भडगाव -०, धरणगाव-१, यावल -०, एरंडोल -०, जामनेर -०, रावेर -०, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्हाभरात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ५०० रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर १ लाख ३९ हजार ७९६ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर १२९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content