टाटांकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । टाटा स्टीलने ट्विट करत देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २००-३०० टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिला आहे

 

कोरोनाने पुन्हा कहर केला असून देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीरसह   ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यं केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यं तसंच केंद्र सरकारच्या मदतीला  टाटा स्टीलने धाव घेतली आहे.

 

रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे.

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.