१०० हात करताहेत साहित्य नगरीची स्वच्छता

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उद्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलन परिसराच्या स्वच्छतेचे काम गेल्या 15 दिवसांपासून सुरू असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सुपरवायझर हैबतराव पाटील यांनी दिली.

साहित्य संमेलन प्रताप महाविद्यालयात होत आहे. त्यानुसार मुख्य सभामंडपासह पूर्ण परिसर झाडणे, कचरा उचलून तो 6 घंटागाड्यात टाकून तो निर्धारीत कचरा डेपोत टाकला जात आहे.
15 फिरते शौचालये

परिसरात 15 फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अमळनेर, धरणगाव, शेंदुर्णी, चोपडा येथून फिरते शौचालय मागविण्यात आले आहेत. प्रत्येक सभागृहाजवळ दोन फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. या शौचालयाची सकाळी, दुपारी व सायंकाळी अशा तीन वेळा सफाई कर्मचारी स्वच्छता ठेवणे, पाण्याची व्यवस्था करीत आहेत. अमळनेर नगरपरिषदेचे टँकर या शौचालयाना सतत पाणी पुरवणार आहे, तर एक व्हॅक्युम क्लिनरही येथे ठेवण्यात आले आहे.
50 कर्मचारी करताहेत स्वच्छता.

गेल्या 10 दिवसांपासून अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे 50 कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे. ते 24 तास परिसरात स्वच्छता ठेवत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी आरोग्य निरीक्षक संतोष संदानशिव, नितीन बिराडे, राम कलोसे हे काम पाहात आहेत.

Protected Content