कंगनाला क्वॉरंटाईनमध्ये रहावे लागणार

शेअर करा !

मनाली वृत्तसंस्था । मुंबईहून हिमाचलमध्ये पोहचल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिला दहा दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन या प्रकारात रहावे लागणार आहे.

अभिनेत्री कंगना राणावत ही हिमाचलमधील आपल्या घरी पोहचली आहे. चोख सुरक्षा व्यवस्थेत कंगना भुंतर येथे पोहोचली. कंगना सोमवारी सकाळी मुंबईहून विमानाने चंदिगड येथे पोहोचली. तेथून कारने कीरतपुर-स्वारघाट, बिलासपूर-मंडी -कंडी कटौला मार्गे कुल्लू येथे पोहोचली. शाढाबाई येथे बहीण रंगोलीच्या घरात काही वेळ थांबून नंतर मनाली येथील सिमसा स्थित घरात पोहोचली. कंगना मनाली येथे आल्याचे वृत्त मिळाल्यानंतर पोलिस आणि आरोग्य विभागाची टीम तिच्या घरी पोहोचली. येथे तिच्या कोविड रिपोर्टसह अन्य कागदपत्रे चेक करण्यात आले.

मनालीत पोहोचल्यानंतर कंगनाकडे कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट नव्हते. त्यामुळे आता होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. बाहेरून हिमाचलमध्ये येणार्‍यांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येणे अनिवार्य आहे. यामुळे आता रिपोर्ट नसल्याने तिला दहा दिवसांसाठी क्वॉरंटाईन रहावे लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!