जळगाव सचिन गोसावी ।आरक्षणाचे लाभ हे सर्व घटकांना समान प्रमाणात मिळावे यासाठी राज्य सरकारने ५९ मागास जातींचा प्रवर्ग जाहीर करावा अशी मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे ,प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढे सांगितले की, शासनाकडून मिळत असलेल्या योजना विकासात्मक बार्बीचा प्रामुख्याने शासनाकडून पाठपुरावा करणे, बहुजन महिलांच्या सशक्तीकरण व सबलीकरण याकरिता विशेष प्रयत्न करणे व दुर्लक्षित मागास कुटुंबाला आधार देणे, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करणे आदी मागण्यांना न्याय देण्यासाठी नव निर्धार अभियान राबविण्यात येत आहे. महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे यांनी नंदूरबार येथून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली असून ५ सप्टेंबर रोजी चिराग नगर मुंबई येथे समारोप होणार असल्याची माहिती दिली. या दौऱ्यात संघटनेचा आढावा घेवून जेथे आवश्यकता असेल तेथे नवीन नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मागील वर्षी कोविड काळामुळे अण्णाभाऊ साठे यांची जन्म शताब्दी साजरी करता आली नाही, परंतु,या वर्षी अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती नव निर्धार अभियानांतर्गत साजरी करणार आहोत. याअंतर्गत समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रमुख उद्देश विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ,ब,क,ड प्रवर्ग आरक्षण लागू करणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष केले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1672853369592601