पाचोऱ्याचे कैलास चावडे व अमळनेरचे मिलींद वाघ उत्कृष्ट तहसिलदार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकताच जिल्हा अधिकारी कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. यात पाचोऱ्याचे कैलास चावडे व अमळनेरचे मिलींद वाघ उत्कृष्ट तहसिलदार म्हणून गौरव करण्यात आला. तर उपविभागात संभाजी पाटील उत्कृष्ट नायब तहसिलदार म्हणून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, भुमिअभिलेख विभागाचे अधिक्षक एम. पी. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.

यावेळी सन २०२१/२२ मधे उत्कृष्ट तहसिलदार म्हणून पाचोरा येथील तहसिलदार कैलास चावडे, अमळनेर येथील तहसिलदार मिलिंद वाघ, भडगाव येथील अव्वल कारकून दिलीप राजपूत, उत्कृष्ट शिपाई गोपीचंद महाजन तर पाचोरा विभागात उत्कृष्ट तहसिलदार मुकेश हिवाळे (भडगाव), पाचोरा येथील निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, भडगाव येथील निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना देण्यात आला. कैलास चावडे यांनी त्यांच्या अर्धांगीनी प्रतिभा चावडे यांचे सह पुरस्कार स्विकारला.

पाचोरा येथील वरखेडी रोडवरील साई मोक्ष मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांचे अध्यक्षतेखाली महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, निवडणूक नायब तहसिलदार रणजित पाटील, भागवत पाटील, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. डी. पाटील, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब नेटके, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष नदिम शेख सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचोरा उपविभागात अव्वल कारकून प्रविण मोरे, भास्कर शहाणे, भाऊसाहेब नेटके, उमेश शिर्के, उमेश पुरी, प्रशांत पगार, संजय साळुंखे, आर. पी. शेजवळ, सुरेश साळुंखे, सिमा पाटील, उमेश वाडेकर, मयूर आगरकर, मयुर पाटील, शेख नदिम, कांतीलाल तेली, जयंत जाधव, हेमंत जडे, गुलाब पाटील यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांचे हस्ते देण्यात आला.

Protected Content